बाळ जोगळेकर

लेन्समधून जग टिपणारा प्रतिभावंत

ग. दि. माडगूळकर

शब्दांच्या दुनियेतील 'अनभिषिक्त सम्राट'!

बाळ जोगळेकर आणि ग. दि. माडगुळकर या दोन दिग्गजांचा वारसा 'बाळ एम. जोगळेकर स्टुडिओ'च्या माध्यमातून त्यांचे नातू अमेय जोगळेकर समर्थपणे चालवित आहेत.

आमच्याविषयी थोडेसे...

लेन्समधून जग टिपणारा प्रतिभावंत

छायालेखन.. म्हणजेच सिनेमॅटोग्राफी हा चित्रसृष्टीतील सर्वांत कमी प्रकाशझोतात असणारा एक घटक! चित्रसृष्टीचा कणा असूनही असंख्य छायालेखक स्वत: कधीही झळकलेच नाहीत. बाळ जोगळेकर हे अशाच काही प्रतिभावंतांपैकी एक! चित्रपटसृष्टीमधील तब्बल ५५ वर्षांच्या प्रदीर्घ आणि देदिप्यमान कारकिर्दीमध्ये जोगळेकर यांनी १६ चित्रपट केले. पण त्यांचे कार्य एवढ्यापुरतेच मर्यादित नाही. देशभरात घडलेल्या असंख्य महत्त्वाच्या घटनांचेही चित्रिकरण जोगळेकर यांनी केले आहे. युरी गागारीन वा राणी एलिझाबेथ यांचे भारत दौरे असो किंवा पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण यांच्या सभा असो, जोगळेकर यांनी त्यांच्या कॅमेर्‍यात हे सर्व टिपले आहे.  लता मंगेशकर, आशा भोसले, उषा मंगेशकर असे चित्रसृष्टीतील मान्यवर आणि डॉ. होमी भाभा यांच्यासारख्या शास्त्रज्ञांचे सत्कार सोहळेही जोगळेकर यांनी चित्रबद्ध केले आहेत.
तब्बल पंचावन्न वर्षांच्या कारकिर्दीमध्ये बाळ जोगळेकर यांना असंख्य आव्हानांचा सामना करावा लागला. या सर्वांवर मात करत त्यांनी कॅमेर्‍याच्या माध्यमातून प्रकाश आणि सावल्यांचा अद्भुत खेळ मांडला.कॅमेर्‍याने केलेल्या चित्रिकरणापलीकडेही जोगळेकर यांनी अनेक कामे केली. चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात त्यांनी छाप सोडली. न्यूज कव्हरेजच्या निमित्ताने देशातील थोर नेत्यांनाही त्यांनी जवळून पाहिले. या सर्वांचा त्यांच्या कामावर आणि आयुष्यावर सकारात्मक परिणाम झाला.
अनुभवी दिग्दर्शक वसंतराव जोगळेकर हे बाळ जोगळेकर यांचे थोरले बंधू! वसंतराव आणि त्यांच्या पत्नी सुमती गुप्ते-जोगळेकर यांनी वेळोवेळी बाळासाहेबांना साथ देत अचूक मार्गदर्शनही केले. ‘न्यूज कॅमेरामन’ ते सिनेमॅटोग्राफर या प्रवासामध्ये बाळ जोगळेकर यांनी असंख्य क्षण कॅमेर्‍याच्या साह्याने जतन केले आहेत. त्यांचा वारसा आज ‘बाळ एम. जोगळेकर’ स्टुडिओच्या माध्यमातून चालविला जात आहे.

शब्दांच्या दुनियेतील 'अनभिषिक्त सम्राट'!

दोन हजारांहून अधिक गाणी आणि १५७ चित्रपटांसाठी पटकथा लिहिणारे, गीतरामायणासारख्या अजोड कलाकृतीचे निर्माते म्हणजे ग. दि. माडगूळकर! सहज सोपी रचना, भावसंपन्न शब्द यांच्या जोरावर गदिमांनी मराठी साहित्यविश्व समृद्ध केले. ‘गोरी गोरी पान..’पासून ‘नाच रे मोरा’पर्यंत लहान मुलांच्या तोंडी असणारी गीते असो वा ‘बुगडी माझी सांडली गं’सारखे गाणे असो, गदिमांच्या प्रतिभेने सर्वांनाच कायम थक्क केले.
गदिमा, सुधीर फडके आणि राजा परांजपे या तिघांनी अनेकदा एकत्र काम केले आणि हाच ठरला मराठी चित्रपटांचा सुवर्णकाळ! याशिवाय, हिंदी चित्रपटांसाठीही अजोड पटकथा लिहिण्याचे काम गदिमांनी केले. व्ही. शांताराम दिग्दर्शित ‘दो आंखे बारह हाथ’, ‘नवरंग’, ‘गुंज उठी शहनाई’ हे चित्रपट गदिमांच्या लेखणीतून उतरले. भारत सरकारने १९६९ मध्ये ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन गदिमांचा गौरव केला. याशिवाय, ‘संगीत नाटक अकादमी’ आणि ‘विष्णूदास भावे सुवर्णपदक’ हे पुरस्कारही त्यांना मिळाले होते.
‘गीतरामायणा’ने तर इतिहासच रचला. वाल्मिकींनी लिहिलेल्या रामायणाची कथा गदिमांनी एकूण ५६ गीतांमध्ये शब्दबद्ध केली. या ऐतिहासिक महाकाव्याचे आजवर हिंदी, गुजराती, कन्नड, बंगाली, आसामी, मल्याळी भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. एक एप्रिल, १९५५ ते १९ एप्रिल, १९५६ या कालावधीत पुणे आकाशवाणीवरून अखंडितपणे ‘गीतरामायण’ प्रसारित झाले. एकाच कवीने रचलेला आणि एकाच संगीतकाराने स्वरबद्ध केलेला हा असा एकमेवाद्वितीय कार्यक्रम होता. हा कार्यक्रम प्रचंड लोकप्रिय झाला.

गदिमांनी चित्रपटासाठी कथा लिहिली, पटकथा लिहिली, संवाद, गीतेही लिहिली. क्वचित काही चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनयही केला. कालांतराने त्यांनी चित्रपट निर्मितीही केली. त्यांच्या गाजलेल्या चित्रपटांपैकी काही मोजकी नावे पाहिली, तरीही गदिमांच्या चित्रसृष्टीतील योगदानाची कल्पना येते. ‘रामजोशी’, ‘पुढचे पाऊल’, ‘गुळाचा गणपती’, ‘सुवासिनी’, ‘जगाच्या पाठीवर’, ‘मुंबईचा जावई’ अशा अनेक दर्जेदार चित्रपटांचा यात समावेश आहे. चित्रसृष्टीतील सर्वच क्षेत्रांमध्ये मुशाफिरी करणार्‍या गदिमांचा वारसाच ‘बाळ एम. जोगळेकर’ स्टुडिओ चालवित आहे.

दैदीप्यमान इतिहास असलेले प्रॉडक्शन हाऊस!

‘बाळ एम. जोगळेकर प्रॉडक्शन हाऊस’ला प्रदीर्घ आणि देदिप्यमान इतिहास आहे. १९६० च्या दशकापासून हे प्रॉडक्शन हाऊस कलाक्षेत्रात कार्यरत आहे. स्वत: बाळ जोगळेकर यांनी या प्रॉडक्शन हाऊसची मुहूर्तमेढ रोवली.

सुरवातीच्या टप्प्यात बाळ जोगळेकर यांचे पुत्र किशोर यांनी ‘दूरदर्शन’साठी काही कार्यक्रमांची निर्मिती केली. यामध्ये त्यांनी ‘दूरदर्शन’साठी काही वार्तापत्रेही तयार केली.

१९९० च्या दशकामध्ये ‘बाळ एम. जोगळेकर प्रॉडक्शन हाऊस’ने आणखी एका नव्या क्षेत्रात दमदार पाऊल टाकले. ‘विको’च्या गजाभाऊ पेंढारकर यांच्यासह या प्रॉडक्शन हाऊसने रेडिओवर एक अनोखा कार्यक्रम सुरू केला. ‘प्रश्न तुमचे, उत्तर आमचे’ या कार्यक्रमास देशभर विविध भाषिकांकडून जोरदार प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमासाठी अक्षरश: कोट्यवधी पत्रे येत असत. देशातील प्रमुख १२ भाषांमध्ये हा कार्यक्रम सादर केला जात होता.

यानंतर ‘दाते पंचांग’, ‘कालनिर्णय’, ‘महालक्ष्मी कॅलेंडर’ अशा दिग्गज ब्रॅंडशीही ‘बाळ एम. जोगळेकर प्रॉडक्शन हाऊस’चे जवळचे संबंध निर्माण झाले. १९९९-२००० च्या कालावधीत रेडिओवर विविध विशेष कार्यक्रम या प्रॉडक्शन हाऊसच्या माध्यमातून प्रसारित झाले.

सध्या ‘बाळ एम. जोगळेकर प्रॉडक्शन हाऊस’द्वारे डॉक्युमेंट्रीज, जाहिराती, रेडिओ जिंगल्स असे काम एकूण १२ भाषांमध्ये केले जाते. याच जोडीला अमेय जोगळेकर यांनी ‘डॉक्यु-ड्रामा’ तयार करण्यासही सुरवात केली. यालाही रसिकांकडून जोरदार प्रतिसाद लाभत आहे.

सेवा

कौतुकोद्गार

आजवर असंख्य दिग्गज मंडळींनी, मोठ्या ब्रँड्सने बाळ एम. जोगळेकर प्रॉडक्शन हाऊससह काम केले आहे.
आमच्या कामाविषयी हे दिग्गज काय म्हणतात, हे त्यांच्याच शब्दांत..!
Devesh Pendharkar Vicco

श्री देवेश पेंढरकर - विको

Chintamani Chitale Shreyas

चिंतामणी चितळे - हॉटेल श्रेयस

Dr. Gauri Kanitkar Anuroop

डाॅ. गौरी कानिटकर - अनुरुप

Dr. Rohit Sane Close Madhavbaug

डॉ. रोहित साने - माधवबाग

Omkar Date Date Panchang

ओंकार दाते - दाते पंचांग

Ravindra Prabhudesai Pitambari

रविंद्र प्रभूदेसाई - पितांबरी

Rohan Shirke Mahalaxmi Calender

रोहन शिर्के - महालक्ष्मी दिनदर्शिका

Zelam Chaubal Kesari

झेलम चौबळ - केसरी टूर्स

Dr. Jayant Abhyankar Sharangdhar

डॉ. जयंत अभ्यंकर - शारंगधर फार्मासिटिकल्स

कौतुकोद्गार आमच्या डिजिटल माध्यमाचे​

आजवर असंख्य दिग्गज मंडळींनी, मोठ्या ब्रँड्सने बाळ एम. जोगळेकर प्रॉडक्शन हाऊससह काम केले आहे.
आमच्या कामाविषयी हे दिग्गज काय म्हणतात, हे त्यांच्याच शब्दांत..!

झेलम चौबळ | केसरी टूर्स

फतेचंद रांका | रांका ज्वेलर्स

गौरी कानिटकर | अनुरूप विवाह संस्था

कृष्णकुमार गोयल | कोहिनूर ग्रुप

वृषाली मेहेंदळे | वृषालीझ स्लिमींग सेंटर

विलास जावडेकर


आमचे चित्रपट

संपर्क साधा

आमच्याशी संपर्क साधायचा आहे?