रेडिओसारखे प्रभावी माध्यम दुसरे नाही, असे नेहमी म्हटले जाते. अगदी पूर्वीपासून रेडिओ या माध्यमाचा जनमानसावर प्रचंड प्रभाव आहे. टीव्हीच्या सुरुवातीच्या कालखंडात काहीसे बाजूला पडलेल्या रेडिओने नव्या सहस्त्रकात पुन्हा एकदा जोमाने डोके वर काढले. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील सर्वसामान्यांशी संवाद साधण्यासाठी रेडिओचाच प्राधान्याने वापर करतात.
‘बाळ एम. जोगळेकर स्टुडिओ’चे एक बलस्थान म्हणजे रेडिओ या माध्यमाशी असलेली ओळख आणि त्यावरील जाहिरातीच्या तंत्रावरील हुकूमत! रेडिओवरच्या प्रभावी आणि दीर्घकाळ लक्षात राहणार्या जाहिराती हे तर ‘बाळ एम. जोगळेकर स्टुडिओ’ची वैशिष्ट्यच आहे.
याशिवाय, रेडिओवर पाच मिनिटांच्या विशेष मुलाखती आणि पाच मिनिटांचा ड्रामा यातही ‘बाळ एम. जोगळेकर स्टुडिओ’चा हातखंडा आहे. विविध उत्पादनांच्या श्राव्य आणि सुरेख जाहिराती, जिंगल्स, व्हॉईस ओव्हर ही कामेही या स्टुडिओद्वारे केली जातात.
संपर्क साधा